शेंगट मासा: (सिंघाडा मासा ) : येलदरी जलाशयातील प्रमुख आणि भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा.
शेंगट मासा : सिंघाडा मासा
Shengat Fish in Yeldari Reservoir Parbhani |
Shengat Fish In Yeldari Reservoir Parbhani |
महाराष्ट्रातील जलाशयामध्ये आणि नद्यांमधील सर्वात लोकप्रिय समजला जाणारा आणि लोकांच्या अतिशय पसंदीचा हा शेंगट मासा आहे, हा मासा खाण्यासाठी सर्वात उत्तम आहे कारण या मध्ये मानवी शरीराच्या उपयुक्त घटक आहेत, या माश्यामध्ये प्रोटीन चा मुबलक प्रमाणात साठा असतो, तसेच ओमेगा-३ आणि ओमेगा-६ तसेच फ्याटी असिड असल्यामुळे हा भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात खाल्ल्या जातो, शेंगट हे मासे हृदय-निरोगी राहण्यासाठी प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. दर आठवड्याला प्रोटीन म्हणून माशांच्या एक किंवा दोन सर्व्हिंगवर जेवणाचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमीत कमी एक तृतीयांश कमी होतो, कारण त्यात हृदय-स्वस्थ ओमेगा -3 फॅटी असिड असतात, ज्यामुळे ट्रायग्लिसेराइड पातळी कमी होते तसेच शरीरातील जळजळ कमी होण्यास आणि मेंदूच्या आरोग्यास मदत होते.
भारतीय नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेंगट मच्छीमाराना मिळतो, आणि बाजारामध्ये त्याला चांगला भाव असल्याने मच्छीमारांच्या तसेच ग्राहकांच्या आवडीचा हा मासा बनलेला आहे, ह्या माश्याला बोनलेस म्हाणून देखील ओळखले जाते, या माश्यामध्ये फक्त एकाच प्रकारचा बोन असतो. हा मासा वरच्या बाजून काळसर राखडी रंगाचा असून पोटाकडील भागामध्ये पांढऱ्या रांगाचां असतो, या माश्याचे शरीर लांब असून मध्यभागी फुगीर असते आणि समोरच्या आणि मागच्या बाजूने निमुळते होत जाते. परभणी मधील येलदरी जलाशय आणि पूर्णा नदी या माश्यांसाठी महत्वाचे स्त्रोत बनले आहे, या शेंगट माश्याची मानवनिर्मित जलाशयामध्ये आणि पोंड मध्ये शेती करत नाहीत, हे माशे शाकाहारी असतात, या माश्यांचे सहजपणे फिलेट मिळते.
___________________________________________________________________________________
English Translation
Shengat Fish (Singhada Fish)
Shengat Fish in Yeldari Reservoir Parbhani |
Shengat Fish In Yeldari Reservoir Parbhani |
It is considered to be one of the most popular and popular fish in the reservoirs and rivers of Maharashtra. As it is a fatty acid, it is widely consumed in India, Shengat fish are a great source of protein for heart-healthy fish. Eating one or two servings of fish per week as a protein reduces the risk of heart attack by at least one third of humans, as it contains heart-healthy omega-3 fatty acids, which lower triglyceride levels as well as help reduce inflammation and brain health.
Shengat fish is found in large quantities in Indian rivers by fishermen, and is a favorite fish of fishermen as well as consumers due to its good price in the market. This fish, also known as boneless fish, has only one type of bone. The fish is dark gray on the upper side and white in the abdomen.The body of this fish is long with a bulge in the center and tapering towards the front and back.The Yeldari Reservoir and the Purna River in Parbhani have become important sources of Shengat fish. These Shengat Fish are not farmed in man-made reservoirs and in ponds.
Wow Sir
ReplyDeleteThanks for such a helpful information