गुंगाळी (पाब्दा मासा) : जगप्रसिद्ध आणि येलदरी च्या पूर्णा नदीमधील सामान्य मासा / Gungali (Panda fish) : World famous fish and common fish in Purna river Yeldari Dam Parbhani.

गुंगाळी (बटर फिश) : पाब्दा फिश : येलदरी जलाशय. 


Lumbini Aquaculture Yeldari
Gungali (Pabda) fish in Purna river

भारत देश हा माश्यांसाठी अतिशय श्रीमंत म्हणून समजला जातो, त्यामध्ये नद्यांमध्ये आणि जलाशय मधील मासे अतिशय चविष्ट आहे आणि संपूर्ण जगभरात भारतीय माश्याना अतिशय मागणी आहे. भारतीय कथला, रोहू आणि मिर्गल त्याच प्रमाणे भारतीय नद्यांमधील गुंगाळी मासे खाण्यासाठी उच्च प्रतीचे समजले जातात. भारतीय जलाशय आणि नद्या मत्स्य व्यवसायसाठी उच्च प्रतीचे स्त्रोत समजले जाते. महाराष्ट्रामधील येलदरी जलाशय आणि पूर्णा नदीमधील गुंगाळी मासा हा खाण्यासाठी अतिशय चविष्ट म्हणून लोकप्रिय आहे. पूर्णा नदीमध्ये गुंगाळी मासा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे, परभणी मध्ये या मासेला गुंगाळी आणि भारतामध्ये तिला पाब्दा मासा म्हणून लोकप्रिय आहे. जगभरात या माश्याच्या चवीमुळे बटर फिश म्हणून संबोधित केले जाते. गुंगाळी मासा येलदरी जलाशय मध्ये विशिष्ट सीजन मध्ये म्हणजे पावसाळा ऋतू मध्ये मिळत असल्याने येलदरीमध्ये आणि परभणी च्या मासळी बाजारामध्ये त्याला खूप मागणी असते. हा मासा मानवी मेंदूच्या विकासाठी आणि शरीराच्या उत्तम वाढीसाठी अतिशय महत्वपूर्ण कामगिरी बजावतो. 

शारीरिक गुणधर्म :

Lumbini Aquaculture Yeldari Parbhani
Gungali (Pabda) Fish: yeldari Reservoir (Lumbini)

गुंगाळी मासे हे गोड्या पाण्यातील मासे आहेत, या माश्यांमध्ये उच्च पोषण मूल्य आणि खाण्यास अतिशय चवदार आहे, आणि या गुणधर्मामुळे बाजारामध्ये या माश्याला मोठी मागणी आणि उच्च मूल्य आहे. गुंगाळी मासे प्रामुख्याने तलाव, दलदल आणि भात शेतात आढळतात आणि हा मासा एक प्रकारचा कॅट फिश आहे, गुंगाळी मासा आशियायी देशामध्ये विशेषतः बांगलादेश, भारत, पाकिस्तान, नेपाळ, आणि काही दक्षिण आशियायी देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. गुंगाळी माश्याचे शरीर दोन्ही बाजूनी सपाट आहे, मधील बाजू समोरील बाजूपेक्षा अरुंद आहे. गुंगाळी माशी हि वालागो अट्टु किंवा बळो माश्यांमध्ये बरेच साम्य आहे. गुंगाळी माश्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे खवले नसतात, गुंगाली माशीचा रंग हा चांदी सारख्या रंगाचा असतो, या माश्याच्या तोंडात मिशांची जोडी असते, पोटापासून शेपटी पर्यंत पेल्विक फिन असते, गुंगाळी माश्याची लांबी हि २५ ते ३० सेमी पर्यंत वाढते. आणि वाजेन हे २५० ते ३०० ग्राम पर्यंत असते. गुंगाळी मासे सहसा वरच्या पातळीच्या पाण्यात राहतात आणि ते सर्व भक्षी आहेत, ते सामान्यतः प्रोटोझोआ जलचर, कीटक आणि मॉस इत्यादी खातात. परंतु त्यांचे आवडते खाद्य हे फिशमिल आहे. 

गुंगाली माशांचे गुणधर्म 

Lumbini Aquaculture Yeldari camp
Gungali (Pabda) fish in Yeldari camp Parbhani

Lumbini Aquaculture Yeldari Camp Parbhani
Gungali Fish : Yeldari reservoir (Lumbini)

गुंगळी माश्याची चव हि बटर सारखी असते आणि अतिशय चविष्ट असते तसेच चमकदार देखावा आणि मऊ देह असणारी कमी काट्याची माशि आहे, उच्च पोष्टिक मूल्य असल्याने बाजारात तिचे उच्च मूल्य असते. गुंगाळी माशामध्ये उत्तम प्रकारचे प्रोटीन असते, आणि मानवी मेंदूच्या वाढीसाठी त्याचा भरपूर उपयोग होतो. भारतीय संस्कृतीमध्ये माश्याचे कालवण अतिशय उत्तम प्रकारे केल्या जाते, त्यात गुंगाळी माश्याचे कालवण भारतीय संस्कृतीमध्ये उत्कृष्ट प्रकारे बनविल्या जाते. या १०० ग्राम माश्याच्या वजनामध्ये ११४ क्यालरी उर्जा मिळते, ५ ग्राम कार्ब, २ ग्राम फ्याट आणि १९ ग्राम प्रोटीन असते. गुंगाळी मासे हे कोलेस्टेरोलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते, हृदयाच्या समस्या, ट्रायग्लीसोराईड पातळी, आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते, गुंगाळी मासा हा ओमेगा - ३ आणि फ्याटी असिड चा विश्वसनीय स्त्रोत आहे, तसेच रोगप्रतिकारक शक्तीस प्रेरणा देण्यासाठी तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास या माश्याचा उपयोग होतो.                                                                                                                                                                 __________________________________________________________________________________

English Translation

Gungali (Pabda) Fish
Lumbini Aquaculture Yeldari camp Parbhani
Gungali (Pabda) fish (Lumbini)


India is considered to be the richest country for fish, with fish in rivers and reservoirs are very testy and Indian Fish in great demand in all over the world. Indian Cutla, Rohu and mrigla as well as Indian river Pabda fish are consider to be of high quality. Pabda fish from yeldari reservoir and Purna river in Maharashtra is very popular as it is very testy to eat. Pabda fish in Purna river is very famous in all over India. In Parbhani district this fish is popular with name Gungali. This fish is known worldwide as the ButterFish because of its flavor properties. Gungali fish is in high demand in Yeldari and Parbhani fish markets as it is available in the Yeldari reservoir during the monsoon season. This fish plays a very important role in the development of the human brain and the optimal growth of the body. 

Physical Characteristic  

Pabda fish are freshwater fish, these fish have high nutritional value and are very testy to eat, and due to this property this fish is in great demand and high value in the market. Pabda fish is found in mainly fresh water reservoirs, lakes and paddy field and is a type of Cat fish. Pabda fish is found in large number in Asian countries especially in Bangladesh, India, Pakistan, Nepal and some South Asian countries. The body of Pabda fish is flat on both side, the middle side is narrow than the front side. The Pabda fish is lot of common with walago attu and Balo fish, there are no scales on the body of Pabda fish, this fish is in silver colored it has a pair of mustaches in its mouth, has a pelvic fin from the abdomen to the tail, and grows up to 25 to 30 cm in length. And weight is 250 to 300 grams. Pabda fish usually live in the upper level of water. they are omnivorous. They generally eat protozoa, aquatic insect and moss etc. But they also like to eat Fish meal.

Conurbations value

Test of Pabda fish is like a butter and look like a silver in color and soft flesh, in this fish having nutritious value, and excellent protein and taste is very excellent. In Indian culture, fish seasoning is done very well, in this fish of 100 grams having 114 calories, 5 grams of carbs, 2 grams of fat and 19 grams of protein. Pabda fish also helps to decrease cholesterol levels, and blood pressure. This fish is reliable source of omega-3 and fatty acid, as well as boosting the immune system and reducing excess body fat. 

Comments

  1. Wow... Amhala yethe navnavin mashanbadal mahiti milat aahe. Ji nakkich amchya Kami yeil. Thank you sir.

    ReplyDelete
  2. Intresting information.now it is time to come together to take partdpart in developement in fishary at Yedari & shidheswardam. I am ready

    ReplyDelete
  3. अत्यंत महत्वाची आणि सोप्या भाषेत माहिती आहे सर...! धन्यवाद...!

    ReplyDelete
  4. Very nice and easy information Sir.....! 💙

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वांबट (बाम) मासा : अतिशय महत्वाचे आणि भरपूर औषधीय गुणकारी फायदे असलेला गोड्या पाण्यातील मासा I येलदरी जलाशयातील लोकांच्या पसंदीचा मासा I Wambat I Baam I Eel I famous fish in Yeldari reservoir Parbhani.

शेंगट मासा: (सिंघाडा मासा ) : येलदरी जलाशयातील प्रमुख आणि भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा.

रोहू (राहू, राहुटा) मासा : गोड्या पाण्यातील प्रमुख मासे (labeo Rohita)