भारतातील प्रमुख मासे
भारतातील प्रमुख जातींचे मासे
आपला भारत जेव्हडा सुंदर आहे त्याचप्रमाणे सुंदर आणि चाविस्ट मासे आपल्या गोड पाण्याच्या जलाशय मध्ये आढळून येतात. भारत हे प्रमुख मासे उत्पादक देशापैकी एक आहे, मासेवर आधारित उद्योगांच्या वाढीसाठी भारताकडे प्रचंड क्षमता आहे आणि सध्या मत्स्य उत्पादन, विपणन आणि खप यापैकी महाराष्ट्र एक केंद्र आहे आणि महाराष्ट्रातील माशांची मागणी संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेरील देखील वाढतच जात आहे, कारण महाराष्ट्राच्या गोड पाण्यातील मासे हे प्रथिनांचे प्रमुख स्त्रोत आहे. भारतामध्ये असलेल्या गोड्या पाण्यातील जलाशयामध्ये माश्यांसाठी लागणारे नैसर्गिक खाद्य भरमसाठ असल्याने मासेंची वाढ हि जलद गतीने होते, त्यामुळे भारतातील प्रमुख कार्प व्येतिरिक्त बाहेर देशातील मासे सुद्धा भारतातील गोड्या पाण्याच्या जलाशयामध्ये टिकून राहतात. भारतामधील गोड्या पाण्यातील असलेल्या प्रमुख जाती आणि भारतातील मासे खाद्यप्रेमींचे आवडते खाद्य म्हणजे कटला, रोहू आणि म्रीगल विविध प्रांतामध्ये या जातीना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते पण खाण्यासाठी या मासे चा भरपूर प्रमाणात वापर केला जातो, तसेच यांची वाढ जलद गतीने होत असल्याने तसेच या मासे पासून उत्तम नफा मिळत असल्याने या मासेंचे उत्पादन करणार्यांना सुधा या मासे च्या जाती फार आवड्तात्त. त्याशिवाय भारतीय पाण्यासाठी चांगल्या पद्धतीने अवलंबल्या गेलेल्या काही विदेशी प्रमुख कार्प्समध्ये सायप्रिनस (कॉमन कार्प), सिल्व्हर कार्प आणि ग्रास कार्प आहेत. नियंत्रित पद्धतीने किंवा कृत्रिम पद्धतीने मासे पालन हे मत्स्य उत्पादन आणि त्याची उपभोगता आणि उपलब्धता वाढविण्याचा सोपा मार्ग बनला आहे. शेतकरी सहजपणे गाव तलाव, टाक्या किंवा मोठ्या जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यावसाय किंवा कोणत्याही नवीन जल संस्थेत मासे वाढवून त्याना बाजारात चांगल्या पद्धतीने नफा मिळवू शकतात शकतात आणि त्यांची आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करू शकतात.
गोड्या पाण्यात आढळणाऱ्या भारतातील मासेंच्या प्रमुख जाती.
1. कटला
कटला भारतातील प्रमुख मासा आहे, खाण्यास खूप चविष्ट आणि भारतामध्ये सर्व गोड्या पाण्यामध्ये, नदी मध्ये आढळून येतो, त्याची लांबी २१३ सेमी (७.0 फूट) पर्यंत आणि ४५ किलो पर्यंत वाढू शकते आहे. कटाला हा पाण्याच्या पृष्ठ भागावरील आणि मध्य भागावरील असलेले अन्न खातो. कटला दोन वर्ष वयाच्या सरासरी वयात आणि सरासरी 2 किलो वजनाने लैंगिक परिपक्वता प्राप्त करते.
2. रोहू (रोहिटा)

रोहू देखील गोड्या पाण्यातील प्रमुख मासा आहे, संपूर्ण भारतामध्ये तो मोठे जलाशय, नदी आणि ओढ्यांमध्ये आढळतो. त्याची लांबी १८२ सेमी आणि ४० किलो पर्यंत वाढू शकते. रोहू हा पाण्याच्या मध्यभागातील अन्न खातो. रोहू हा दोन वर्ष वयाच्या सरासरी वयात आणि सरासरी २ किलो वजनाने लैंगिक परिपक्वता प्राप्त करतो.
3. म्रीगल

म्रीगल देखील गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहे, संपूर्ण भारतामध्ये जलाशय आणि
नदी तसेच ओढांमध्ये आढळतो. त्याची लांबी १९० सेमी आणि ४० किलो पर्यंत वाढू शकते
तसेच म्रीगल पाण्याच्या ताळ भागातील अन्न खाते. तसेच २ वर्ष वयापासून लैंगिक
परिपक्वता प्राप्त होते.
Comments
Post a Comment