येलदरी जलाशय आणि मत्स्य व्यावसाय

परभणीतील येलदरी धरण आणि मत्स्य व्यावसाय 
 


                          Fig : Yeldari Dam (A.K)
 

महाराष्ट्रामधील शेती व्यावसायात जवळपास २५ % लोक मत्स्य व्यावसाय करत आहेत. आणि त्यामध्ये दरवर्षी शेकडो लोक वाढतच आहेत, तसेच महाराष्ट्रातील येलदरी जलाशयमधील मत्स्य व्यावसाय हे स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या असंख्य मार्गापैकी एक आहे परंतु हे नक्कीच महाराष्ट्रातील दुर्लक्षित पैलू पैकी एक आहे. हे खरे आहे कि कृषी क्षेत्रांत परभणी जिल्ह्यामध्ये पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत त्यामध्ये मत्स्य व्यावसाय आहे परंतु मत्स्य व्यावासायसाठी येलदरी जालाशायाचा त्या दृष्टीने विचार करण्यात आला नाही, आणि अद्याप या जलाशयाचा  विकास झाला नाही, येथे मासेमारीच्या दृष्टीकोनातून खूप मोठे भांडार आहे परंतु आजही ते क्षेत्र दुर्लक्षित आहे, त्यामुळे केवळ परभणी जिल्ह्याची वाढ होत नाही तर बेरोजगारीचे उच्चाटन आणि आर्थिक विकासात चालना देण्याचे प्रयत्न देखील कुचकामी ठरत आहेत, 
 
येलदरी जालाशायामधील मत्स्य व्यावसाय हा फायदेशीर व्यावसाय आहे जो परभणी जिल्ह्यातील आणि इतर अनेक जिल्ह्यात व्यापक होऊ शकतो.
 


                   fig : Yeldari Reservoir (A.K)               
                        
 
परभणी जिल्ह्यातील येलदरी जालाशायामधील ताजे माश्यांची मागणी खूप जास्त आहे कारण या जलाशयामध्ये कुठूनही सांडपाणी येत नाही किंवा जवळपास कुठलीही वसाहत नसल्यामुळे पाणी पिण्याच्या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने आणि मासेमारीसाठी अतिशय उत्तम आहे तसेच इतर मांसाहारापेक्षा मासे स्वस्त असल्याने त्यापून चविष्ट आणि परवडणारे जेवण बनते. इतर अनेक व्याव्सायाच्या तुलनेत मत्स्य व्यावसाय सुरु करणे सोयीचे आहे. महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेंची मागणी फार वाढतच आहे, आणि महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या गोड्या पाण्यातील माश्यांच्या मागणीनुसार माश्यांचा पुरवठा वेगवान राहण्यास असमर्थ असल्याने मासे आपल्या बाजारपेठेत उच्च दरांना आकर्षित करत आहेत. त्यासाठी लोकल चे मच्छिमार आणि उद्योजक याना संधी मिळाल्या पाहिजेत, परंतु हे अद्यापही झालेले दिसून येत नाही.

          मत्स्य व्यावसाय करण्यासाठी महत्वपूर्ण वैशिष्ठे 

     
                            fig : Yeldari Reservoir (A.K)

         बाजारपेठेतील टार्गेट लक्षात घेवून माश्यांचे उत्पादन घेणे गरजेचे आहे, नियोजनाने मासे पकडणे आणि                   त्याची विक्री केली पाहिजे, तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि जाणकार कर्मचारी तेथे नियुक्त केले पाहिजे.                     उत्पादनाची कार्यक्षमता, व्येवास्थित व्येवास्थापण आणि नफ्यावर भर देवून उत्पादन घेतले पाहिजे, उत्पादन             खर्च आणि मिळकत याची लेखी नोंद ठेवली पाहिजे आणि त्याचे विश्लेषण केले पाहिजे.

         माश्यांची बाजारपेठ आणि विक्री 

     
                           Fig : Fish Market (A.K)

मासे व्यापाऱ्यांचा शोध सुरु करण्यापूर्वी मासे विक्रीसाठी तयार होईपर्यंत प्रतीक्षा करायला नाही पाहिजे, बरेचसे मत्स्य शेतकरी एक मोठी चूक करतात टी म्हणजे जेव्हा मासे विक्रीसाठी तयार असेल तेव्हाच मासे खारीद्दारांचा शोध घेणे सुरु करतात, कारण तलावामध्ये माश्यांची कमीजास्त प्रमाणात वाढ होत असते त्यामुळे मोठे मासे विक्रीसाठी काढणे योग्य असते नाहीतर माश्यांची वाढ थांबते, आणि माश्यांची वाढ थांबल्यानंतर माश्याना जितका काळ थांबल्यानातर तेव्हडाच जास्त आपला खर्च होईल आणि आपला नफा कमी होईल, मत्स्य व्यावसायिकासाठी  फिश मार्केट हि प्रेरक शक्ती असते आपण त्यांचे पोटेन्शियल लक्षात घेतले पाहिजे, उत्पादित माश्यांची किंमत, दरवेळी उत्पादन होण्याचे प्रमाण आणि वारंवार किती विक्री करता येईल हे मार्केट द्वारे निश्चित करायला पाहिजे, त्यामुळे मत्स्य व्यावासायामध्ये गुंतवणुकीची पातळी आणि वाढणारी माश्यांची प्रजाती हे तलावाचा आकार निश्चित करते. 

येलदरी जलाशय आणि मासेमारी साठीचे लक्ष्य 

 
                             
         
  












मासे पालन व्यवसायातील आपले एकूण लक्ष्य बाजारात मासे पुरवठा करणे हे प्रतिस्पर्धी किंमतींवर असले पाहिजे जे अद्याप आपल्याला चांगला नफा मिळवून देण्यास अनुमती देतात. या व्यवसायाची नफा वाढविण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे थेट ग्राहकांना विकणे. या धोरणाची नकारात्मक बाजू अशी आहे की आपण मध्यस्थांकडून खरेदी केलेल्या उच्च खंडांच्या तुलनेत एका वेळी मासेची थोडीशी मात्रा विक्री कराल. आपण आपल्या माशांसाठी सातत्याने ग्राहक आधार मिळविण्यास सक्षम असल्यास, ही रणनीती खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल. आपला व्यवसाय चालवण्याचा खर्चही कमी करेल.

त्यामुळे प्रशासनाने आणि शासनाने दुर्लक्षित झालेल्या येलदरी जलाशयाकडे जातीने लक्ष दिले पाहिजे आणि लोकल च्या मच्छिमारांसाठी संधी निर्माण केल्या पाहिजे. 

                                            

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वांबट (बाम) मासा : अतिशय महत्वाचे आणि भरपूर औषधीय गुणकारी फायदे असलेला गोड्या पाण्यातील मासा I येलदरी जलाशयातील लोकांच्या पसंदीचा मासा I Wambat I Baam I Eel I famous fish in Yeldari reservoir Parbhani.

शेंगट मासा: (सिंघाडा मासा ) : येलदरी जलाशयातील प्रमुख आणि भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा.

बळो मासा , बोल फिश (वालागो अट्टु) : भारतीय गोड्या पाण्यातील मासे (Balo Fish, Boal Fish , Wallago Attu Fish : Fresh Water Fish In India)