भारतीय मत्स्य व्यवसाय (Indian Fishery Sector ) : An Overview

आढावा : भारतीय मत्स्य व्यावसाय (Indian Fisheries: An Overview)

                    fig : Yeldari Reservoir (A.K)

भारतीय मत्स्य पालन आणि मत्स्य व्यावसाय हे खाद्य उत्पादनाचे महत्वपूर्ण क्षेत्र आहे, जे पोष्टिक आणि उत्तम अन्न पुरवठा करण्याची सुरक्षा प्रदान करतात. या शिवाय १४ दशलक्ष हून अधिक लोकाना रोजीरोटी आणि रोजगार मिळवून देतात आणि कृषी निर्यातीत महत्वपूर्ण योगदान देतात. सन १९४७ पासून म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यानंतर या देशात झपाट्याने आणि वाढ होत गेली आहे. सन २०१९ ते सन २०२० मध्ये एकून मत्स्य उत्पादन १५.२० दशलक्ष मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे, त्यामध्ये ७० % हे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन असून एकूण उत्पादनापैकी ५० % हे मत्स्य पालन साठी असून जागतिक मत्स्य उत्पादनाच्या सुमारे ७.० % आहे.

 भूजल क्षेत्रामध्ये मत्स्य पालानासाठीची वाढ आणि त्यात मत्स्य व्यवसाय चे योगदान यामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. माश्यांमध्ये उच्च दरवाढीचे वेगवेगळे पैलू, उदा. समुद्रामधील मासेमारी, समुद्र किनार्यावरील मासेमारी, भूजल मासेमारी, गोड्यापान्यातील मासेमारी आणि थंड पाण्यातील मासेमारी हे मत्स्य व्यवसाय मध्ये महत्वपूर्ण योगदान देत आहेत. अर्थव्यवस्था, पर्यटन, रोजगार, निर्यात, आरोग्य आणि फिश बास्केट हे त्याचे महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.














जगातील ७५ देशामध्ये  सुमारे ५० हून अधिक विविध प्रकारचे मासे आणि सेल्फिश उत्पादनाची देशामध्ये निर्यात केली जात आहे. भारतातील कृषी व्यवसायामधील मत्स्य व्यवसाय हा निर्यातीमधील सर्वात मोठा व्यवसाय म्हणून अस्तित्वात आला आहे, त्यामध्ये १५.२७ लाख टन मासे आणि ५५,१०८.९४ कोटी रुपये हे भारतामधील निर्यातीचा वाटा आहे, तसेच संपूर्ण भारतामधून जगामध्ये एकूण उत्पादनामध्ये सुमारे १२ % आणि कृषी उत्पादनामध्ये सुमारे २३.१२ % एव्हडी निर्यात केली जात आहे हे एकूण GDP पैकी ०.९५ % आणि Ag. GDP मध्ये ६.१२ % एव्हडी आहे, आणि दिवसेंदिवस वाढतच आहे.

भारतीय समुद्रकिनार्यावर सुमारे २.५ लाखाहून अधिक फिशिंग क्राफ्ट, ७ मुख्य मासेमारी साठीचे बंदर ७५ मासेमारी साठीचे लहानमोठे बंदर आणि १५३७ लँडिंग सेंटर हे ५.० पेक्षा जास्त मच्छिमार लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कार्यरत आहेत, मत्स्य व्यावसायाला चालना देण्यासाठी देशात एन एफ डी बी  ( राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळ) आणि बी एफ डी ए (ब्राकीश वाटर फिशेरी डेव्ह्ललोपमेंट एजेन्सी ची स्थापना केली गेली आहे. देशामध्ये जवळपास ५० अब्ज मत्स्य जिरे ( फिश सीड ) आणि ६० अब्ज कोलंबीच्या जीर्याचे उत्पादन केले जाते, आणि अलीकडच्या काळात विविध मत्स्य जाती आणि प्रजाती वाढतच आहेत आणि मत्स्य व्यवसायाला आणखीन महत्व प्राप्त करून देत आहेत. 










भारतीय मत्स्यव्यावसाय आणि जगामध्ये भारताची स्तिथी 
(Indian Fisheries and Global Position of India)

 जागतिक स्तिथी               तिसरा क्रमांक 
 दुसरा भूजल साठी          
जी डी पी मध्ये मत्स्य व्याव्सायचे
योगदान (%) 
 ०.९५ 
कृषी जी डी पी मधील योगदान
योगदान (%)
 ६.१२ 
दरडोई मासेंची उपलब्धता (Kg)
 ९.० 
वार्षिक निर्यात कमाई (कोटी)  ९५,१०८.९४ 
रोजगार (दशलक्ष )  १५.०० 

स्त्रोत (Resources) 

 किनारपट्टी                    ८११८ किमी                               
 अन्य आर्थिक क्षेत्र २.०२ दशलक्ष चौ .किमी
 शेल्फ खंड  ०.५३० दशलक्ष चौ. किमी 
 नद्या व कालवे  १९५९१० किमी 
 जलाशय  ३.१५० दशलक्ष हेक्टर 
 मानवनिर्मित तलाव  २०४१४ दशलक्ष हेक्टर 
 पूर मैदानाचे तलाव  ०.७९८ दशलक्ष हेक्टर 
 ब्रॅकिशवॅटर्स १.२४० दशलक्ष हेक्टर 
  अन्य   ०.२९० दशलक्ष हेक्टर 

काही महत्वाच्या बाबी (Some Facts)

 सध्याची मासेमारी                ९.१२ दशलक्ष मेट्रिक टन       
 भूजल मासेमारी  ५.०२ दशलक्ष मेट्रिक टन 
 खार्या पाण्यातील मासेमारी  ४.०६ दशलक्ष मेट्रिक टन 
 संभवे मासे उत्पादन  १०.१२ दशलक्ष मेट्रिक टन 
 मत्स्य बीज उत्पादन  ४०,००० दशलक्ष फ्राय 
 ह्यचरी
१६२३ युनिट 
 एफ एफ डी ए  ४२९ 
 बी एफ डी ए  ३९ 

(source : NFDB)












   

Comments

  1. This is really unpresidented information related to the fisheries to realise the huse potential of this all wheather business for Educated unemployed Youths who consists the Two Third population of the country and create huge employment opportunities to the large section of the Nation as well.
    However, there is need to have Government support for most things, if the take advantage of this young mind as well as to boost grow of economic activities then Government must ensure the sustainable financing to this sector which is highest contributor in National GDP in Agricultural Allied Activities......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वांबट (बाम) मासा : अतिशय महत्वाचे आणि भरपूर औषधीय गुणकारी फायदे असलेला गोड्या पाण्यातील मासा I येलदरी जलाशयातील लोकांच्या पसंदीचा मासा I Wambat I Baam I Eel I famous fish in Yeldari reservoir Parbhani.

शेंगट मासा: (सिंघाडा मासा ) : येलदरी जलाशयातील प्रमुख आणि भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा.

बळो मासा , बोल फिश (वालागो अट्टु) : भारतीय गोड्या पाण्यातील मासे (Balo Fish, Boal Fish , Wallago Attu Fish : Fresh Water Fish In India)