कथला मासा : भारतीय प्रमुख मासा
 |
Catla Fish In Yeldari Dam (Amol . K )
|
 |
Catla Fish In Yeldari Reservoir (Catla Catla )
|
 |
Catla Fish In Yeldari Reservoir : Catla
|
|
मासेमारीवर आधारित उद्योगाच्या वाढीसाठी भारताकडे प्रचंड क्षमता आहे आणि सध्या मत्स्य उत्पादन, विपणन आणि खप यापैकी एक केंद्र आहे. माश्यांची मागणी वाढतच जात आहे कारण मासे हे पोष्टिक अन्न आणि प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत आहे, भारतात गोड्या पाण्यातील प्रमुख माश्यांच्या जातीमध्ये कथला, राहू (रोहू ) आणि मिरगल (मृगल) आहे. सध्याच्या विज्ञानिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिस्तिथी लक्षात घेता गोड्यापान्यातील मासे वाढत्या लोकसंखेला पोष्टिक अन्न पुरविण्याचे काम करत आहेत. गोड्यापान्यातील प्रमुख मासे हे अनुवंशिकतेने आणि प्रामुख्याने गंगा नदी, सिंधू नदी, आणि ब्राम्हपुत्रा नदी येथून आल्या आहेत. भारतातील गोड्या पाण्यातील प्रमुख माश्यामध्ये कथला, रोहू आणि मिर्गल या आहेत, त्यांच्या वेगवान वाढीमुळे, अतिशय उत्कृष्ट चवीमुळे आणि त्यांच्या पाण्यामधील राहण्याच्या पद्धतीमुळे त्यांचे गोड्यापान्यातील मासेच्या यादीमध्ये सुरवातीपासून नाव आहे, गंगा नदीच्या उगमस्थानापासून अगदी पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि बर्मा या देशात सुद्धा हे मासे प्रामुख्याने आढळून येतात. तसेच या व्येतिरिक्त थायलंड, व्हीयतनाम, लाओस या सारख्या बऱ्याच देशाने या मासेना आपल्या देशात वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे. गोड्यापान्यातील प्रमुख जातीचे मासे हे नदीमध्ये प्रजनन करतात तसेच यांचे कृत्रिमरीत्या सुद्धा प्रजनन करता येते त्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागते आणि ह्याचेरी ची आवश्यकता असते.
 | Catla Fish In Yeldari Reservoir (Catla Catla )
|
नैसर्गिकरित्या मासे हे तलावात, नद्यांत आणि जलाशयात आढळतात, ते नद्यांच्या वाहत्या पाण्यामध्ये आणि मे ते ओगस्ट मध्ये प्रजनन करतात, म्हणजेच नद्यांमध्ये हे प्रजनन होते. त्यामुळे जून ते सप्टेंबर मध्ये माश्यांचे बीज आपल्याला मिळते. कथला मासा हा संमिश्र मत्स्य पालनासाठी अतिशय उपयुक्त ठरतो ज्यामध्ये माशे हे पाण्याच्या पृष्ठभागावरील आणि तळ भागावरील अन्न खातात. कथला हा वाहत्या पाण्यामध्ये आणि स्थिर जलाशयामध्ये उत्तेजन देवून प्रजनन घडवून अनु शकतात. हा मासा पाण्यातील वनस्पती प्लवंग खातो. कथाल्याच्या तोंडाचा आकार हा वरच्या दिशेन असतो त्यामुळे या माशीला पाण्याच्या पृष्ठ भागावरील अन्न खाणारी माशी म्हटलेले आहे. कथला या माशी चा रंग काळसर असून पंख चमकदार आणि राखडी रंगाच्या आहेत तर पोट चंदेरी पांढरे आहे, काही प्रजातीमध्ये रंगही गडद काळ्या रंगाचे असतात. त्यांची प्रजनन स्थिती वयाच्या दुसर्या वर्षापासून होते, कथला हि प्रजाती झापाट्याने वाढणारी आहे आणि जास्तीत जास्त हा ६३ किलो चा वजन मिळवू शकतो. कथला या प्रजातीला देशामध्ये आणि अंतर्देशात खूप मागणी आहे. मादी कथला हा १८ महिन्यानंतर अंडी घालू शकतो. आणि एका वेळेला १८ हजार ते ४२ हजार अंडी घालू शकतो, कथला प्रामुख्याने पाण्याच्या पृष्ठ भागावर आढळून येतो.
 | Catla Fish In Yeldari Reservoir : Catla
|
उत्तरेकडील गंगा नदी पासून ते कृष्णा नदीपर्यंत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि बर्माच्या दक्षिणेस सुरू असलेल्या जलाशयांमध्ये आणि नद्यांमध्ये आढळून येतात. हे नेपाळमध्येही आढळते. काठाला माशी हि १९०९ मध्ये कुदापाह कालव्यात गोदावरी नदीतून सुरू झालेल्या आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोर जिल्ह्यात पेना नदी आणि जोडलेल्या पाण्याचा मार्ग सापडला. तसेच १९२० च्या दशकात केव्हरी नदीमध्ये कथला ची बोतुकली देखील मिळाली होती. नंतर हि प्रजाती पेरियार तलाव, पवई तलावात दाखल झाली. नंतर १९५४ मध्ये इस्रायल आणि जपान आणि मॉरिशस या देशांना आणि १९६० च्या दशकात कथला बीजिंग मधे निर्यातही केली गेली. झिम्बाब्वे, इस्त्राईल, भूतान, फिलिपिन्स, अमेरिका, जपान, श्रीलंका, लाओस, पाकिस्तान, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम आणि मॉरिशस यासारख्या देशांमध्येही कथला निर्यात केला जातो. |
Great information sirji
ReplyDelete